करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्या मध्ये अवैधरित्या चालणारे व्यवसायाला आळा घालण्याचं काम करमाळा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी चांगल्या प्रकारे केले आहे परंतु मटका बंद झाला आहे मात्र चक्री जुगार जोमात चालू झाला आहे. एस. टी. स्टॅन्ड च्या परिसरात सर्वसामान्य गोरगरीब या चक्री जुगाराला बळी पडत आहेत. त्याच्याकडे लक्ष देण्याची मागणी

सर्व सामान्य जनते मधून होत आहे. मटका बंद केल्या मुळे सर्व सामान्य नागरिकांमधून पोलीस निरीक्षक घुगे यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे अवैध व्यवसाय मध्ये मटका हा व्यवसाय प्रामुख्याने जोमात चालू होता त्याला आळा बसला आहे मात्र शहरा मध्ये चक्री जोमात चालू आहे. मटका व्यवसाय करणारे मटकाकींग करमाळा शहरामध्ये किराणा दुकान टाकल्या सारखं बिनधास्त पणे गाळ्या मध्ये तर काही जण अतिक्रमण च्या जागेवर पानटपरी च्या नावाखाली बिनधास्त पणे मटका

व्यवसाय करताना दिसतात. मटक्या मुळे  सर्वसामान्य गोरगरीब लोकांसह अनेकांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. हातावर पोट असणारे मोलमजुरी करणारे लोक यामध्ये पूर्ण पणे भरकटलेली व मटक्याला बळी पडल्याचं दिसून येते. या अमिषाला बळी पडून त्यांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. घरातील कर्ता पुरुष मटक्या सारख्या जुगाराच्या आहारी गेल्या मुळे अनेकांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहिलेले आहे. मटक्या मुळे खूप मोठं प्रापंचिक कधी ही भरून न निघणारं नुकसान अनेक गोरगरीब कुटूंबांचं झाले आहे. याचं गांभिर्य ओळखत मटक्याला आळा बसवण्याचे काम पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मटका बंद झाल्यामुळे मासा पाण्या मधून काढल्यावर जसा तडफडतो तशी अवस्था मटका घेणार्या अवैध व्यवसाय कांची झाली आहे. असे मत राष्टवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी व्यक्त केले आहे. चांगलं काम करणार्या अधिकार्यांच्या पाठीशी तालुक्यातील जनता नेहमीच राहिल्याचं मत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *