
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहर व तालुक्यात बकरी ईद शांततेत साजरी करण्यात आली असून आज सकाळी आठ वाजता करमाळा शहरातील मक्का मस्जिद, जामा मस्जिद, नुरानी मस्जिद, आयेशा मस्जिद, अराफत मस्जिद, मॉं आयेशा मस्जिद, दर्गाह मस्जिद येथे सकाळी आठ वाजता ईद निमित्त नमाज पठण करण्यात आले असून यामध्ये मुफ्ती अबु रेहान, मौलाना मोहसीन शेख, मौलाना सिकंदर, मौलाना मरगुल हसन, मौलाना अन्वर मौलाना, मौलाना सय्यद, अली मुजावर, मौलाना वाजीद, मौलाना इक्राम बागवान यांनी नमाजपठण प्रार्थना केली तर सकाळी साडे आठ वाजता ईदगाह मैदान येथे मुजाहीद काझी यांनी नमाजपठण प्रार्थना केली.

तसेच तालुक्यातील कंदर, केम, जेऊर, कुगाव, उमरड, आवाटी, साडे, हिसरे, पांडे सावडी, कुंभारगाव, जिंती, पारेवाडी, कोर्टी, रावगाव, आदी ठिकाणी बकरी ईद ची नमाजपठण करण्यात आली आहे.
यावेळी मौलाना मोहसीन म्हणाले की, बकरी ईद म्हणजे श्रद्धा विश्वास व त्यागाची शिकवण देणारा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती समृद्धी, उत्तम आरोग्य लाभो यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

यावेळी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी ईदगाह मैदान येथे जाऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच या बकरी ईदच्या निमित्ताने माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी, नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.