करमाळा प्रतिनिधी

येत्या विधानसभेत भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे  असे आवाहन श्री मकाई सह. साखर कारखाना माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले. ते मोरवड येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते, पुढे बोलताना बागल म्हणाले की, मोरवड हे गाव माजी राज्यमंत्री लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या विचारांचे आहे. या गावाला बागल गटाने नेहमीच तालुका स्तरावर काम करण्याची संधी दिली आहे. तसेच या गावातील व परिसरातील प्रमुखांनी विविध विकास कामे करण्यासाठी विशेष पुढाकार घ्यावा त्यावर आपण भाजप वरिष्ठ नेते यांच्या कडे पाठपुरावा करून या परिसराला निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही या वेळी बागल यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उध्दव नाळे हे होते. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, श्री मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, ज्येष्ठ नेते व संचालक बाळासाहेब पांढरे, संचालक नवनाथ बागल, सतीश नीळ, युवराज रोकडे, अजित झांझुर्णे, सचिन पिसाळ, बापूराव चोरमले, गोवर्धन करगळ, रामभाऊ हके, आशिष गायकवाड, रेवणनाथ निकत, संतोष पाटील, गणेश झोळ व नूतन स्वीकृत संचालक पदी निवड झालेले कल्याण सरडे सर, अशोक पाटील, विलास काटे, अनिल शिंदे, राजेंद्र मोहोळकर, गणेश तळेकर, बाजार समितीचे संचालक काशिनाथ काकडे, आदिनाथचे माजी संचालक नामदेव भोगे, गौडरेचे माजी उपसरपंच अशोक हनपुडे, फिसरेचे माजी सरपंच भारत रोकडे, बबन दौंड, निमगावचे वि.का सोसायटीचे चेअरमन अतुल नीळ, जगन्नाथ ननवरे, रावगावचे सरपंच संदीप शेळके, युवा नेते अमित बागल, सोगवचे माजी सरपंच स्वप्नील गोडगे, उंदरगावचे सरपंच युवराज मगर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नूतन स्वीकृत संचालक व विद्यमान संचालक मंडळ यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन स्वीकृत संचालक कल्याण सरडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार राजेंद्र मोहोळकर यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *