
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढार चिंचोली भिगवन जोडणारा डिकसळ पुल हा काही दिवसापूर्वी जड वाहतुकीस बंद केला होता त्याचं कारण ही तसंच होतं हा पूल ब्रिटिशकालीन असल्याने त्याची काल मर्यादा संपलेली आहे. काही दिवसापूर्वी याच पुलाचे दगड ढासळले होते व आजही त्याची तशीच परिस्थिती आहे. दगड ढासळल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग

करमाळा यांच्या अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली व सदरील पुल वाहतुकीस धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले नंतर त्यांनी हा पूल वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला परंतु तालुक्यातील पश्चिम भागातील 40 ते 45 गावांची गरज पाहता या गावातील नागरिकांना भिगवन बारामती इंदापूर पुणे या ठिकाणी दवाखान्यास इतर कामासाठी सतत प्रवास करावा लागतो व पूल बंद

केल्यामुळे त्यांची गैरसोय झाली होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी पर्याय मार्ग म्हणून या या पुलावरती हलक्या वाहनांना वाहतुकीस परवानगी देऊन जड वाहतूक बंद करण्यात आली होती. ऊस वाहतूक सह इतर जड वाहनांना बंदी घातली होती. वाहने जाऊ नयेत म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला ब्यारीगेट बसवण्यात आले होते परंतु आता हे बॅरिगेट काढून या पुलावरून जड वाहतूक चालू आहे. या वाहतुकीमुळे या पुलावरती कोकणातील सावित्री नदीवरील पुलावर जी दुर्घटना घडली होती त्याची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. तालुक्यातील बोट बुडीची घटना ही केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे. ती घटना ताजी असताना त्याची पुनरावृत्ती त्याच नदीवर घडण्यास वेळ लागणार आता तरी प्रशासनाला जाग येईल का ? नाही असा सवाल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी केला आहे. प्रशासनाने हलगर्जीपणा न करता डिकसळ पुलावरील जड वाहतूक त्वरित थांबवावी अन्यथा दुर्दैवी घटना घडल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करू असा इशारा मांढरे पाटील यांनी दिला आहे.