करमाळा प्रतिनिधी

वीजेच्या मागणीस यश, सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल बारा उपवीज केंद्रामध्ये पाच एम व्ही क्षमतेचे अतिरिक्त तेरा फिडर मंजूर झाले असल्याची माहिती माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती सांगताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, सन २०१६ पासुन आपण करमाळा तालुक्यातील ३३/११ उपवीज केंद्रांची क्षमतावाढ केली पाहिजे म्हणून सतत मागणी करत होतो. या मधून आपण काही सबस्टेशन मध्ये पाच आणि तीन एम व्ही क्षमतेचे अतिरिक्त फिडर मंजूर करण्यात यशस्वी झालो. परंतू यामुळे करमाळा

तालुक्यातील वीजेचा प्रश्न काही प्रमाणात सुटला गेला. तालूक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याने वीजेची मागणी जादा प्रमाणात होत असुन यावर उपवीज केंद्र सक्षमीकरण हाच एकमेव पर्याय होता. आपण हा प्रश्न लावून धरला आणि यास अखेरीस यश मिळाले आहे. आता साडे, वीट, वांगी, जिंती, दहिगाव, शेटफळ, पारेवाडी, मांजरगाव, साडे (५ एम व्ही अधिक ५ एम व्ही), लव्हे, करमाळा आणि मांगी (५ एम व्ही अधिक ५ एम व्ही) या ठिकाणी आता पाच एम व्ही क्षमतेचे अतिरिक्त फिडर बसवले जाणार आहेत. साडे उपवीज केंद्रामध्ये पाच एम व्ही क्षमतेचे अतिरिक्त दोन फिडर मंजूर करण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम सदर सबस्टेशनला जोडलेल्या गावांवर होणार असून शेती पंपासाठी पुर्ण दाबाने आणि अखंडीत वीज पुरवठा होईल. तसेच या भागातील लाईट स्ट्रीप होणे तसेच लोडशेडींग आदि समस्या दुर होतील. असेही माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी सांगितले. तसेच आपल्या उर्वरित मागण्यांसाठी आपण पाठपुरावा कायम चालू ठेवणार असून ३३/११ के व्ही क्षमतेचे नवीन सबस्टेशन आणि तालूक्यात आणखी एक २२० के व्ही क्षमतेचे वीज केंद्र निर्माण होण्यासाठी आपण मागणी करत राहणार आहोत असेही माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *