करमाळा शहरात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान
करमाळा:- दि, (. )
करमाळा शहरात आज दुपारी तीन वाजता अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली या वादळी वाऱ्यामुळे शहरातील तेली गल्ली येथील सारीका राहुल क्षीरसागर या विधवा महिलेच्या घरावरील पत्रे उडून गेले तसेच घरातील अन्नधान्य भांडी कुंडी याचे नुकसान झाले असून सदर घटना स्थळी नगरसेवक संजय सावंत यांनी धाव घेतली व तातडीने गाव कामगार तलाठी यांना कळवुन तातडीने पंचनामा करून घेतला यामध्ये अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले असून यामध्ये सदर महिला ही मजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करते परंतु निसर्गाने अचानक फटका दिल्यामुळे शासनाने त्वरित तातडीने मदत करावी अशी मागणी करमाळा नगरपरिषदेचे नगरसेवक संजय सावंत यांनी केली आहे
याच प्रमाणे किल्ला वेस बारवेजवळील सुतार कारागीर बाळासाहेब डोळस यांच्या घरावर झाडाच्या फांद्या तुटून पडल्या यामध्ये घराचे पत्रे खाली आले यामध्ये डोळस यांचे कुटुंब थोडक्यात बचावले
शहरात दुपारी तीन वाजता वीज गेली असुन अद्याप पर्यंत वीज आली नाही महावितरण चे कर्मचारी वादळाने ज्या ठिकाणी तारा तुटल्या आहेत त्याचा शोध घेऊन युद्ध पातळीवर काम करत आहेत

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *