जेऊर करमाळा

‌जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात विज बिल थकीतेमुळे लाईट कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्वरित लाईट कनेक्शन न जोडल्यास संभाजी ब्रिगेड तर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. जेऊर शहर अध्यक्ष

अतुल निर्मळ यांचा इशारा जेऊर ग्रामीण रुग्णालयात अंदाधुंद कारभार चालू आहे. प्रशासनाने दखल घेऊन त्वरित लाईट बिल भरावे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील असून गावापासल्या जवळील तालुक्यात अशी

परिस्थिती असेल तर महाराष्ट्रात आरोग्य विभागाची काय परिस्थिती असेल. तसेच जेऊर येथे त्यांचा शासकीय दौरा होऊन जातात जेऊर येथील ग्रामीण रुग्णालयाची लाईट गुल. जेऊर हे करमाळा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून ग्रामीण

भागातील लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असून जर रात्रीच्या वेळेस उपचार होऊ शकत नाही व दिवसा लाईट नसल्यामुळे औषधांचा साठा खराब होऊन गेला असेल. तसेच वीज बिलाची रक्कम 585400 रुपये असून तरी ते त्वरित भरण्यात यावे

तसेच त्वरित लाईट न चालू झाल्यास तानाजी सावंत यांचा संभाजी ब्रिगेड करमाळा तालुक्यात कोठेही कार्यक्रम होऊ देणार नाही.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *