करमाळा प्रतिनिधी

 31 मार्च रोजी मुथा अबॅकस अकॅडमी मधून ज्या विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली फाउंडेशनच्या पाच लेवल कम्प्लीट केलेल्या आहे त्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते यश कल्याणी सेवाभावी सदन येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे

अध्यक्ष गणेशजी करे पाटील, मुख्याध्यापक बागवान सर, सुराणा विद्यालयाचे मुख्याध्यापक वायदंडे सर, राणीताई वारे, डॉ. अमोल दुरंदे, विधाते मॅडम, मोहिते मॅडम, पवार मॅडम, उत्तम विटूकडे सर या सर्वांच्या हस्ते सुवर्णपदक व ट्रॉफी चे वितरण

करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिंदे मॅडमने केले. फाउंडेशन लेव्हल कम्प्लीट करण्यासाठी मुथा मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले. या सर्व विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही विक्रमांचा उंचांक नेहमी मिळवलेला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांची नावे – सार्थक मकरंद वनारसे, आदित्य सुहास कापसे, स्वराज गणेश विटूकडे, गौरव दत्ता विटूकडे, समीक्षा महेश थोरे, स्पंदन बापू घरबुडे.

सर्व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *