करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेड तर्फे रमजान पवित्र महिण्यानिमित्त आलिफ मस्जिद व इंदिरानगर मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले संभाजी ब्रिगेड हि संघटना

सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित घेऊन चालणारी आशी एकमेव संघटना आहे व जाती जातीत तेड निर्माण न करता सर्व जातीतील लोकांना एकत्रित घेऊन काम करणारी व विचारधारेवर सर्व समाज बांधवांचं संघटन करणारी संघटना आहे व समाज

समाजात जातीय दोष न करता समाजात जातीय सलोखा राखण्याचे काम कित्येक वर्षापासून संभाजी ब्रिगेड ही संघटना करत आहे. यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, तालुका उपप्रमुख दादासाहेब थोरात, बाळासाहेब

झोळ, बालाजी गावडे, निलेश पाटील, सुहास पोळ, अतुल निर्मळ, पांडुरंग घाडगे, पिंटू जाधव, आदिनाथ माने, अजित उपाध्ये, महेश कांडेकर, अविनाश घाडगे, हेमंत शिंदे, किशोर कदम, जयकांत गावडे, विजयकांत गावडे व दोन्हीही मस्जिद मध्ये बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *