
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुक्यातुन मुबई येथील गुढीपाडवा मेळाव्यास 9 एप्रिल रोजी शेकडो मनसैनिक जाणार. दरवर्षी प्रमाणे शिवतीर्थावर पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रशांत गिड्डे यांच्या

मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातुन शेकडो मनसैनिक मुबई येथे जाणार असुन त्याची तयारी जोरात चालु आहे अशी माहिती मनसे तालुकाध्यक्ष संजय (बापु) घोलप यांनी दिली. यावेळेस जि.उपाध्यक्ष मनसे नानासाहेब मोरे, तालुकाउपाध्यक्ष

अशोक गोफणे, तालुकाउपाध्यक्ष राजाभाऊ बागल, शहराध्यक्ष सतिश फंड, शहरउपाध्यक्ष सचिन कणसे, केम शहराध्यक्ष सुधीर धोत्रे, शेलगांव शाखाअध्यक्ष बाळासाहेब वीर, पारेवाडी शाखाअध्यक्ष गणेश काळे, जि.उपा.मनविसे आनंद मोरे,

तालुकाध्यक्ष मनविसे श्रीकांत चव्हाण, करण आलाट, आबासाहेब जगताप, योगेश काळे, स्वप्निल कवडे पदाधिकाऱ्यांसह मनसैनिक उपस्थित होते.
