करमाळा प्रतिनिधी

आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरत अवताडे यांनी दिली आहे.

आवताडे म्हणाले की, आमदार संजयमामा शिंदे यांचे करमाळा मतदार संघात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्यावर जनतेचा खूप विश्वास आहे. त्यांच्या सूचनेनुसार करमाळा तालुक्यातील आम्ही सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते खासदार रणजितसिंह

नाईक निंबाळकर यांचे काम एक दिलाने करणार आहोत. या संदर्भात सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. आगामी लोकसभेच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती गटात कसे नियोजन करता येईल, गावोगावी कसे

भेटता येईल, संबंधित मतदारांशी कसा संपर्क करता येईल याचे नियोजन करणार आहोत. ज्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य करमाळा तालुक्यातून आम्ही सर्वजण देणार आहे असा विश्वास राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भरत अवताडे यांनी व्यक्त केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *