पुरवठा विभागात नागरिकांची पिळवणूक – शहराध्यक्ष जगदीश आगरवाल
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तहसील पुरवठा विभागात रेशन कार्ड धारकांची पिळवनुक होत आहे ती थांबवावी अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील नागरिक 50 50 किलोमीटर वरून रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकणे, ऑनलाइन करणे, नवीन कार्ड काढणे, दुरुस्ती करणे, अशा अनेक समस्येसाठी येत असतात या ठिकाणी सर्वर बंदी कर्मचारी नाही उद्या या परवा या असे कारणे सांगितले जात आहे या हेलपाट्याने ग्रामीण भागातील नागरिक आहेत तरी करमाळा तहसील अधिकारी यांनी लवकरात लवकर याबाबत योग्य निर्णय घ्यावा नागरिकांचे हेलपाटे थांबवावे असे अध्यक्ष आगरवाल यांनी सांगितले आहे.
………..
पुरवठा विभागात अपुरे कर्मचारी असल्यामुळे अडचणी निर्माण झाले आहेत पहिला कर्मचारी हा कर्जत येथे कामानिमित्त निघून गेला आहे आता लवकरच दोन कर्मचारी आले आहे पुरवठा विभागाचा कारभार सुरळीत लवकरच होईल याबाबत योग्य त्या सूचना त्यांना दिल्या आहे- शिल्पा ठोकडे,तहसीलदार करमाळा