करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं 2 येथे महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

       प्रत्येक उपक्रम तेवढ्याच ताकदीने राबवत, विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षणावर देण्यावर भर  आणि घरोघरी

शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या या शाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित महिला वर्गाच्या हस्ते जिजाऊ साहेब, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी

स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात घेतलेली गगन भरारी, घरातील स्त्रीची निर्णायक भूमिका तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यामध्ये  स्त्रिची भूमिका, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच का असावे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेमध्ये संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, बादली चेंडू टाकणे, रिंग टाकणे अशा विविध मनोरंजक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या

संख्येने उपस्थित असणाऱ्या महिलांनी मोठ्या उत्साहाने आणि स्फुर्तपणे या प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे 80 वर्षाच्या आजीबाईंनी सुद्धा संगीत खुर्चीमध्ये सहभाग घेत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि सहशिक्षक किरण जोगदंड यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन केले.

    या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना खातगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सुवर्णा अविनाश मोरे, ग्रामपंचायत सदस्य तेजश्री राजेंद्र कोकरे तसेच कौशल्य संपत रणसिंग यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व महिला वर्गाला देखील सहभाग प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन खातगाव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते.

      या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम यांच्या अमृत रसोई या उपक्रमाला आणि करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खातगाव नं. 2 येथील महिला बचत गटाने जिल्हा परिषद शाळा खातगाव नं.2 शाळेस अमृत रसोईसाठी अर्थातच प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत उत्कृष्ट आहार देता यावा म्हणून मिक्सर, कुकर, कपसेट असे साहित्य भेट म्हणून दिले.

    शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष झेंडे आणि शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे व उपशिक्षक किरण जोगदंड यांनी शाळेच्या वतीने हे साहित्य स्विकारले. आजचा दिवस खुप छान वाटला असे म्हणत दरवर्षीच असे कार्यक्रम शाळेत आयोजित करावेत असे मनोगत उपस्थित महिला वर्गाने व्यक्त केले.

तालुक्यापासून दूर अंतरावर असून सुद्धा शाळेमध्ये एवढ्या प्रभावीपणे आणि बहुसंख्य महिलांचे उपस्थित हे विविध उपक्रम राबविल्याबद्दल करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार

अधिकारी सुग्रीव नीळ, जयवंत नलवडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्णा मोरे, उपसरपंच दत्तात्रय कोकरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, शा.व्य.स.अध्यक्ष संतोष झेंडे आणि सर्व सदस्य तसेच उपस्थित महिला वर्गांनी मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि सहशिक्षक किरण जोगदंड यांचे भरभरून कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *