
चिखलठाण प्रतिनिधी
चिखलठाण ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सहा कुटुंबांना बायोगॅस संयंत्राचे वितरण सरपंच धनश्री गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
चिखलठाण ग्रामपंचायतच्या पुढाकारातून पंचायत समिती करमाळा यांच्या वतीने गावातील सहा लाभधारकांना बायोगॅस

संयंत्राचे वितरण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष केरू गव्हाणे, रावसाहेब नेमाणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
बायोगॅसचा हा घरातील स्वयंपाकासाठी इंधनाबरोबरच शेतातील पिकासाठी उत्तम खत म्हणून उपयोगी आसल्याने

हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असून यासाठी शासनाच्या वतीने अनुदान मिळणार असल्याने जास्तीत जास्त कुटुंबाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन धनश्री गलांडे यांनी केले. यावेळी बारामती इको सिस्टीम टेक्नॉलॉजी कंपनीचे अभिमन्यू नागवडे यांनी हे संयंत्र बसवण्याचे प्रात्यक्षिक सांगून याचे महत्त्व व फायदे विषद करून उपस्थितांच्या शंकांचे

निरसन केले व सर्व माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाला मकाई कारखान्याचे संचालक दिनकर सरडे, चिखलठाण सोसायटीचे अध्यक्ष विकास गलांडे, मच्छिंद्र सरडे, विजय सुराणा संतोष सरडे, इलाई इनामदार, रोहित कोकाटे,

संतोष चव्हाण यांच्यासह गावातील लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते कामाचे प्रास्ताविक श्रीपाल गव्हाणे यांनी केले तर आभार सतीश बनसोडे यांनी मांनले.

फोटो ओळी:-चिखलठाण ता. करमाळा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने बायोगॅस संयंत्राचे वितरण करताना सरपंच धनश्री गलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, केरू गव्हाणे, दिनकर सरडे, रावसाहेब नेमाणे व इतर मंडळी.

