
करमाळा प्रतिनिधी
मौजे सावडी ता.करमाळा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित पुणे येथे झालेल्या ग्रीको महाराष्ट्र केसरी २०२४ मध्ये ९७ किलो वजनी गटात सुवर्णपदक व स्पर्धेचा बेस्ट प्लेअर किताब मिळाल्याबदल आमचे मित्र,महाराष्ट्र चॅम्पियन पै.उदयसिंह सतिष शेळके यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा बार्शी विधानसभा निरीक्षक आशपाक जमादार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा ता.कार्याध्यक्ष सुजित बागल, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे ता.अध्यक्ष तथा लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, पत्रकार जयंत दळवी, पत्रकार अशोक मुरुमकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरका र्याध्यक्ष बापु तांबे, सामाजिक कार्यकर्ते विकास गोंदकर, हमीद नालबंद आदि उपस्थित होते.




