
करमाळा प्रतिनिधी
कंदर ग्रामस्थांच्या वतीने आळंदी देवाची येथे १० मार्च ते १२ मार्च दरम्यान त्रैदिनी अखंड हरिनाम सप्ताह व अमूतानुभव ग्रंथ पारायण आयोजन केल्याची माहिती हभप काकासाहेब भोसले महाराज यांनी दिली आहे.

हभप त्रिंबक भोसले महाराज, हभप बाळासाहेब भोसले महाराज यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह चे आयोजन केले जाते.
यावेळी कलशपूजन व विनापूजन हभप श्रीकांत भोसले महाराज यांच्या हस्ते होणार आहे. या सप्ताहात १० मार्च रोजी हभप

काकासाहेब भोसले महाराज यांचे कीर्तन होणार आहे तर ११ मार्च रोजी हभप उद्धव भोसले महाराज यांचे कीर्तन होणार आहे तसेच १२ मार्च सकाळी दिंडी प्रदक्षिणा होऊन सकाळी १० ते १२ वा. हभप नारायण भोसले महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

या सप्ताहात प्रवचन,प्रवचन,हरिपाठ,काकडा आरती,भजन इ होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.कंदर ग्रामस्थांच्या आळंदी येथील सप्ताहाचे हे १० वे वर्ष आहे.


