जेआरडी माझा

शोभा चंद्रकांत बल्लाळ संस्थापिका / अध्यक्षा स्वप्नल फाउंडेशन, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची राष्ट्रीय उपाध्यक्ष पुण्यातच नाही तर अख्या महाराष्ट्रात शोभा ताई हे नाव माहित नाही असे नसावे. गेली पंचवीस वर्षे शोभाताई या महिलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी व त्या स्वावलंबी होण्यासाठी विशेषता कार्यरत असतात. कोरोनाच्या काळात महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी ऑनलाईन क्लासेस, आरोग्यावर चर्चासत्र, घरी बसून बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल याविषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते.

अनाथ आश्रमामध्ये विविध कार्यक्रम घेणे, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत हे विचारून मदत करणे. सगळ्यांचे मित्र, मैत्रिणीचे वाढदिवसाच्या दिवशी अनाथ आश्रमात जाऊन त्यांना आनंद देणे. महिलांसाठी बचत गट स्थापन करून त्याद्वारे उदबत्ती, मेणबत्ती, मसाले प्रशिक्षण,शिवण क्लास, जरदोशी क्लास, ब्युटी पार्लर क्लास, कराटे क्लास,फॅशन डिझाईन क्लास, पालकांसाठी पाककला स्पर्धा इत्यादी महानगर पालिकेकडून फ्री मधे उपलब्ध करून दिले. व्यवसायासाठी महिलांनी स्वतःच्या

पायावर उभे राहण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण देऊन शासनाकडून निधी मिळून दिला. आज अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. शोभा ताईंचा जन्म एका खेड्यात झाला. दहावी पर्यंत शिक्षण झाले की लग्न झाले आणि शिक्षण अर्धवट सुटले. पण म्हणतात ना नशीबाची साथ आणि पती देवांच्या साथीमुळे त्या  शिक्षण पुर्ण करू शकल्या. साथीदाराची साथ ही त्यांना एखाद्या मित्राप्रमाणे मिळाली. सामाजिक क्षेत्रात येण्यामागे त्यांच्या पतीचा खूप मोठा हात आहे. मुलं लहान असतानाच

समाजाप्रती आपले काही देणे लागते या भावनेने झपाटलेल्या शोभाताई आणि त्यात पतीची साथ अशी सुरवात झाली. पहिली सुरवात ही गोवा स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या सस्थेतून झाली.आज मोहन दादा नी एक छोटसं झाड लावलं होत त्याच वृक्षात रूपांतर झालं आहे असे म्हणाले तर वावग नाही. घर संसार ,सासर-माहेर अशी तारेवरची कसरत शोभाताईंची सुरू होती.ही कसरत सुरू असताना एक एक यशाचे शिखर त्या चढत होत्या.आलेल्या संकटाना त्या सामोरे जात होत्या.

हसतमुखाने वावरत असल्याने समाजातील अनेक महिलांना तीच्याकडे बघून प्रेरणा मिळत असे आणि शोभाताई मी केलेल्या कामामुळे माझी भगिनी सुखी झाली हे पाहून आनंदी  होत असे. अशी एक एक करत अनेक तालुका, जिल्हा, महाराष्ट्र आणि आता महाराष्ट्राबाहेर ही शोभाताई ची ओळख ही सामाजीक कार्यकर्ती म्हणून ओळखल्या जातात. एक महिला अनेक महिलांना एकत्र आणून काम त्यांच्यासोबत काम करणे सोपे  नव्हते.पण ही किमया देखील शोभाताईंनी करून दाखवली.

जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यातून नंबर काढून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे. जागतिक महिला दिन, बालदिन,हळदी कुंकू समारंभ, नवरात्रीत भोंडला, गौरी-गणपती सजावट स्पर्धा,निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात आणि अजूनही करतात. महिलांना पोल्ट्री फार्म चे ट्रेनिंग देऊन रोजगार उपलब्ध करून दिला.मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिर,गरीबांना धन्य वाटप,आदिवासी मुलांना शालेय साहित्य,

पूरग्रस्तांना कपडे, धान्य, पाणी,चादर आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. कुठेही प्रसिध्दी दिली नाही. महिलांना ताण-तणावातून मुक्त होण्यासाठी सहलीचे आयोजन करणे, वृक्षारोपण करणे, दारुमुक्तीसाठी प्रयत्न,एड्स ग्रस्त महिलांच्या बरोबर दिवाळी साजरी करून फराळाचे वाटप. फ्रेंडशिप डे साजरा करणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. गरीब रुग्णांचे बिल कमी करणे, माफ करून घेणे इ. कामे केली जातात. पर्यावरणासाठी नदी काठचे प्लास्टिक, कचरा गोळा करून पर्यावरणास मदत करणे.एका मुलील दत्तक घेतली असून ती सध्या इयत्ता आठवी मधे शिकत आहे. तिचा सर्व खर्च स्वप्नल फाऊंडेशन कडून केला जातो.

….

राज्यस्तरीय विविध क्षेत्री पुरस्कार नामांकन प्रक्रिया २०२४

स्वप्नल फाउंडेशन आयोजित २०२४ व्या वर्षातील राज्यस्तरीय गुणिजन गौरव  शानदार पुरस्कार वितरण सोहळा २०२४ या उपक्रमात हार्दिक स्वागत.

पुरस्कार नामांकन प्रस्ताव पाठवण्यासाठी या नंबर वर संपर्क करा 9860634764 शोभाताई बल्लाळ अध्यक्षा स्वप्नल फाउंडेशन या पुरस्कार सोहळ्यात पुरस्काराचे नामांकन पाठविण्यासाठी 9860634764 वर संपर्क करा.

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

गुणवंत शिक्षक, आदर्श कार्यगौरव समाजरत्न, उद्योजक, नारीरत्न, लोकगौरव, सेवारत्न, कृषीरत्न, सांस्कृतिक, गुणीजन रत्न गौरव जीवन, आरोग्यसेवक, आदर्श ग्रंथमित्र, आदर्श कीर्तन सेवा, आदर्श पोलीस पाटील, व्यसनमुक्ती कार्यगौरव, आदर्श युवा रत्न, आदर्श बालगौरव, गुरूरत्न, आदर्श शिक्षक, आदर्श कवी, आदर्श सरपंच, आदर्श माता, अध्यात्मिक गौरव, उत्कृष्ठ खेळाडू

राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. असेही अखेर बल्लाळ यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *