
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस पडलेला पाहता शासनाने तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे असे असताना करमाळा तालुक्यात महावितरण व शहरांमध्ये करमाळा नगरपालिका यांनी चालवलेली सक्तीची वसुली थांबवावी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्र्वादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी दिला आहे. करमाळा नगरपालिका घरपट्टी, पाणीपट्टी, व्यापारी भाडेपट्टा याची वसुली मार्च महिन्याच्या

नावाखाली सक्ती जी करताना दिसत आहे. रिक्षा वरती स्पीकर लावून घरातील वस्तूचा निलाव केला जाईल. चौका-चौकात डिजिटल बॅनर लावून नावे प्रसिद्ध केले जातील, सोशल मीडिया प्रिंट मीडिया मधून बदनामी केली जाईल अशा प्रकारे

धमकविण्यात येत आहे. कर भरणे नागरिकांचे कर्तव्य आहे परंतु नागरिकांना सुविधा देणे हे देखील करमाळा नगरपालिकेचे कर्तव्य नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील रस्ते, वीज, स्वच्छता, पाणीपुरवठा सर्व कारभार रामभरोसे

झालेला आहे. नागरिक तक्रार घेऊन करमाळा नगरपालिकेमध्ये गेले असता त्या ठिकाणी कर्मचारी हजर नसतात, वेळेवर भेटत नाहीत अशी अवस्था असताना कर वसुली कोणत्या अधिकाराखाली करतात हा शहरातील नागरिकांना पडलेला प्रश्न

आहे. महावितरण कडून देखील सक्तीची वसुली केली जात आहे. घराचे विज बिल घेत आहोत. शेती नाही असे अधिकारी सांगताना दिसतात परंतु शेतात पिकलं तरच घरात येईल ना घराचे भरायचे अन शेतीचे नाही हा निकष कशाच्या आधारे

लावला आहे. कमी पावसामुळे शेती वरती अवलंबून असणारी तालुक्यातील बाजारपेठ अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडले आहे. शहरातील बाजारपेठ आर्थिक दृष्ट्या पूर्ण तोट्यात गेलेली आहे. व्यापारी व शेतकरी यांच्या वरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनलेला आहे. असे असताना मात्र महावितरण व करमाळा नगरपालिका सक्तीची वसुली करताना दिसत आहेत. ही वसुली त्वरित थांबवा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मांढरे पाटील यांनी दिला आहे.