
करमाळा प्रतिनिधी
जेऊर येथे ८ ते १४ मार्च पर्यंत जागतिक महिला दिनानिमित्त २२व्या ‘महिला महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील मित्र मंडळ व ग्रामपंचायत जेऊरच्या सहकार्यातून गेली एकवीस वर्षे अखंडितपणे महिला

दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याच प्रमाणे यंदाच्याही महिला महोत्सवात जेऊर व परिसरातील महिलांसाठी भरगच्य कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ज्योतीताई

नारायण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जयश्री दळवी, मंगल गादीया, ताहिरा शेख भाभी, नंदाताई गादीया, कल्पना पाबळे, जनाबाई कांबळे, रत्नमाला बादल, भाग्यश्री वाघमोडे, अजिता पाटील, ग्रा.प.सदस्या समीरा दोशी, रोहिणी सुतार, यास्मीन

शेख, अनिता जगताप, उषा गरड, उज्वला कुलकर्णी, साधना लुणावत, अपर्णा पाथ्रुडकर, सुनिता पाटील, रेणुका दोशी, उषा सरक, अंकिता वेदपाठक, सुनिता वाघमारे, दिपा दोशी, गयाबाई बदे,शीतल पाटील,अलका व्यवहारे, रागीनी ठाकर, राणी सरडे,

मंगल जगताप, मनीषा वनवे, मीनाक्षी सरक, भाग्यश्री वाघमोडे, भारती बलदोटा, अश्विनी देशपांडे, मनीषा लोंढे, संजीवनी महामुनी, सुवर्णा सानप, प्रफुल्लता देशपांडे, संगीता तळेकर, माया सपकाळ, आदि उपस्थित होत्या. रोहिणी सुतार व अपर्णा

पाथ्रुडकर यांनी स्वागतगीत म्हटले तर आभार समीक्षा कुलकर्णी हिने मानले. यामध्ये ८ मार्चला महिला महोत्सवाचे उद्घाटन, ९ मार्च ला रांगोळी, उखाणे, व फनी गेम्स स्पर्धा, १० मार्च ला अंताक्षरी व फनी गेम्स, १२ मार्चला वेशभूषा,अभिनय व फनी गेम्स, १३ मार्च ला वक्तृत्व, पाककला व फनी गेम्स, १४ मार्च ला नृत्य व बक्षीस वितरण अशा प्रकारे कार्यक्रम होतील.

………………..
प्रत्येक महिला ही कलागुणांनी संपन्न असतेच. त्यांना आपल्या कलागुणांच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी फक्त एक सुसंस्कृत व हक्काचे व्यासपीठ हवे असते. आणि हा उद्देश ठेवून मा.आ. नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न गेली एकवीस वर्षे अखंडितपणे करत आहोत. आणि यापुढेही करत राहू – ज्योतीताई नारायण पाटील