
करमाळा जिंती
रामवाडी परिसरातील उजनी बँकवाँटर जवळ चोरांचा धुमाकूळ पोलीसांनी चोरट्यांवर कारवाई करावी याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी दिले पोलीस अधिकारी व कमलाई नगरी प्रेस कार्यालयात, बबन मारूती वारगड वय 60 वर्ष, व्यवसाय शेती, रा. रामवाडी ता.करमाळा जि.सोलापूर समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब देतो की,मो.नं. 9822661880

मी रामवाडी या ठिकाणी पत्नी लंका असे एकत्रात राहणेस असुन मी शेती व्यवसाय करून कुटुंबाची उपजिवीका भागवितो. आमची रामवाडी शिवारात शेती असुन त्या शेतीला पाणी देणे करिता आम्ही रामवाडी शिवारात उजणी धरणाच्या बॅकवाटर येथुन शेतीला पाणी आणले आहे. तसेच आमचे प्रमाणे महेश दादा माने, जनार्दन परशुराम आंबोधरे, सुरेश सुंदरदास डोळे,

हणुमंत नरहरी गलांडे, बापु पोपट जगताप, बाबुराव काशिनाथ आंबोधरे सर्व रा. भिलारवाडी ता.करमाळा तसेच आमचे गावातील शहाजी नामदेव मुळीक या सर्वांनी त्यांच्या शेती करिता रामवाडी ते भिलारवाडी अशी स्वतंत्र पाईप लाईन करून पाणी आणले आहे. सर्वांच्या मोटार हया रामवाडी शिवारात उजणी धरणाच्या बॅकवाटर येथे आहेत. दि. 01/03/2024 रोजी

रात्री 10/00 वा. मी माझे शेतात आमचे शेतीला पाणी देवून लाईट गेल्याने परत घरी आलो. माझेप्रमाणे शेतकरी हे लाईट गेल्याने त्यांच्या घरी गेले. त्यांनतर दुसरे दिवशी दि. 02/03/2024 रोजी दुपारी 02/00 वा. लाइट येत असल्याने मी माझे शेतात पाणी देणेकरीता गेलो. त्यावेळी माझे मोटरला पाणी आले नाही म्हणुन मी रामवाडी येथे मोटार असलेल्या ठिकाणी

जावून पाहिले असता तेथे माझी मोटर त्याठिकाणी दिसली नाही. त्यावेळी माझे प्रमाणे महेश दादा माने, जनार्दन परशुराम आंबोधरे, सुरेश सुंदरदास डोळे, हणुमंत नरही गलांडे,बापु पोपट जगताप, बाबुराव काशिनाथ आंबोधरे तसेच शहाजी नामदेव मुळीक हे तेथे आले होते. त्यावेळी मी त्यांना माझी 5 एच.पी. मोटर ही त्याठिकाणी दिसली नाही म्हणुन मी त्यांना विचारले

असता त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांच्या ही मोटरच्या आतिल तांब्याची वायडींग तार नसल्याचे सांगितले. त्यावेळी आम्ही सर्वानी सदर मोटरचा व मोटरच्या आतिल तांब्याची बायडींग ताराचा आजुबाजुला शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही. म्हणुन आमची खात्री झाली की, माझी मोटर व त्यांच्या मोटरच्या आतिल तांब्याची वायडिंग तारा या कोणीतरी अज्ञात

इसमांनी चोरून नेली आहे. त्याबाबत तक्रार देण्यास पोलीस ठाणेस आलो आहे. आमचे चोरीस गेलेल्या मोटारीचे व वायडिंग ताराचे वर्णन खालील प्रमाणे असे 8,000/- रूपये एक 5 एच.पी. टेक्समो कंपनीची हिरव्या रंगाची पाणबुडी गोटार जु.वा. किं.अं., 49,000/- रूपये किंमतीच्या महेश दादा माने जनार्दन परशुराम अंबोधरे, सुरेश सुंदरदास डोळे, हणुमंत

नरहरीजगताप,बाबुराव काशिनाथ अंबधरे यांच्या नावे असलेल्या एच.पी. सात मोटरच्या आतिल तांब्याची वायडिंग तारा जु.वा. किं.अं.57,000/- रूपये येणे प्रमाणे वरील वर्णनाची 5 एच.पी. टेक्समो कंपनीची पाणबुडी मोटर व सात 15 एच.पी.मोटरच्या आतिल तांब्याची वायडिंग तारा दि. 01/03/2024 रोजी रात्री 10:00 वा. ते दि 02/03/2024 रोजी दुपारी 02:00 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. म्हणुन माझी त्या अज्ञात चोरटया विरुध्द फिर्याद आहे. माझा वरील संगणाकावर टंकलिखीत केलेला फिर्यादी जवाब मी वाचुन पाहिला दो माझे सांगणेप्रमाणे बरोबर टंकलिखीत केलेला आहे.