करमाळा प्रतिनिधी

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या येथे संघरचनेतून गेलेले सर्व स्वयंसेवक यांनी श्रीराम दर्शन घेऊन श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे प्रकाशजी गुप्ता यांना कारसेवक ललित अग्रवाल यांच्यातर्फे घी देण्यात आले. त्याचबरोबर श्रीराम नवमी उत्सव समिती करमाळा यांच्यातर्फे श्री रामाचे मूर्ती देऊन समितीचे हजेरी लावण्यात आली.

या दौऱ्या दरम्यान शनिवारी हनुमान गडी वर देखील श्रीराम नवमी उत्सव समिती आयोजित हनुमान चालीसा म्हणण्यात आले. यावेळी एड. प्रियल अग्रवाल, संघर्ष दयाळ, अनंत मसलेकर, संकेत दयाळ, विनोद इंदलकर, विश्वजीत निंबाळकर, शुभम रोकडे, भुजंग गोरे व सर्व स्वयंसेवकांनी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे आभार मानून मंदिर प्रतिष्ठापनाबद्दल आनंद साजरा करून अयोध्या येथील राम लल्लाचे दर्शन घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *