
करमाळा प्रतिनिधी
अखेर टेंभुर्णी ते जातेगाव राष्ट्रीय महामार्गाचे 45 मीटरचे राजपत्र प्रसिद्ध झाले अशी माहिती गुलाबराव बागल यांनी सांगितलेली आहे.
सदर राजपत्रात कोणत्या गावातील कोणत्या गट नंबर मधील कीती जमीन संपादित होणार आहे. याचा तक्ता दिलेला आहे ज्या जमीन मालकांची जमीन संपादित होणार आहे त्या व्यक्तींना भूसंपादनाच्या जमिनीच्या क्षेत्राच्या बाबतीत काही तक्रार असल्यास राजपत्र प्रसिद्धीच्या दिनांकापासून 21 दिवसाच्या आत भूसंपादन अधिकारी अर्थात प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांचेकडे

लेखी द्यावयाचे आहे. मुदती तक्रार नसल्यास पुन्हा काहीही तक्रार चालणार नाही. बऱ्याच व्यक्तींच्या जमिनीचे गट विभाजन झालेले आहे. परंतु राजपत्रात मूळ गटातील किती जमीन जाते हेच दिलेले असल्याने जमिनीचा मोबदला मिळताना विभक्त पद्धतीने जमीन मोबदला मिळणार नाही व नंतर जमीन मोबदल्याबाबत आपापसात तक्रारी होण्याची शक्यता आहे. तेव्हा

सर्वांनी सावध होऊन गटविभाजनाप्रमाणे जमीन भूसंपादनाचे क्षेत्र दाखवण्यात यावे असे अर्ज द्यावेत म्हणजे पुन्हा तक्रारी होऊन अडचणी निर्माण होणार नाहीत. तसेच या प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात काही गावांचा उल्लेख आलेला नाही. सदर गावे कोणत्यातरी कार्यालयाच्या चुकीमुळे राजपत्रात आलेली नाहीत. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा चालू आहे. दुरुस्तीचा प्रस्ताव दिल्ली कार्यालयास गेलेला असून लवकरच त्याचे प्रसिद्धीकरण होईल. त्यासाठी दिल्ली स्थित प्रतीक नाथा शिंदे

करमाळेकर हे दिल्लीमध्ये प्रयत्नशील आहेत. हा रस्ता 60 मीटर भूसंपादनाचा होणार होता परंतु केंद्र शासनाने तो 45 मीटर भूसंपादनाचा मंजूर केला व त्याच्या राजपत्र मंजुरी साठी तीन-चार महिन्याचा कालावधी लागला. परंतु अखेर आमच्या प्रयत्नाला यश आले व 5 फेब्रुवारी 2024 रोजी राजपत्र प्रसिद्ध झाले. या रस्त्याची टेंडर प्रक्रिया चालू असून सहा सात कंपन्यांनी टेंडर भरले आहे. परंतु टेंडर उघडण्याची मुदत वारंवार वाढवली जात आहे अर्थात लवकरच टेंडर उघडले जाईल.

प्रांताधिकारी कार्यालयाने करमाळा व माढा भूमापण मोजणी कार्यालयाना पत्रे देऊन संयुक्त मोजणीसाठी किती रक्कम भरावी लागेल हे चार-पाच दिवसांपूर्वी कळविले आहे. सदर कार्यालये ही कार्यवाही त्वरित करतील अशी अपेक्षा आहे. अर्थात त्याचाही पाठवा आम्ही करत आहोत. ही मोजणी फी भरली गेल्यानंतर संयुक्त मोजणी केली जाईल व 45 मीटर च्या मार्गाचे डीमार्केशन म्हणजेच खुणाचे डांब रोवण्याचे काम सुरू होईल अर्थात हे सर्व प्रसिद्धीकरण मी

लोक जागृतीसाठी केले आहे.
या ठिकाणी या कामाचे कोणतेही क्रेडिट घेण्याचा माझा अथवा माझ्या सहकार्यकर्त्यांचा उद्देश नाही. गुलाबराव बागल