
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर आर आर सीची कारवाई झाली त्यावेळेस माझे टेंडर नव्हते त्यामुळे संजय गुटाळ यांनी अगोदर व्यवस्थित माहिती घ्यावी माझी बदनामी केल्यामुळे अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे अशी माहिती रामदास शिंदे यांनी दिली आहे.

आर आर सी करताना संजय गुटाळे उपस्थित होते. त्यांनी साखरसाठा योग्य असल्याशिवाय कारवाई केली का..? या प्रमाणे कारखान्यातील वाहने चोरून विकली त्याप्रमाणे त्यांनी साखर विकली असावी यावेळी वॉचमन सुरक्षा अधिकारी यांची चौकशी

करावी दिं. 24-9-23 ते 29-9-23 या काळात वाहने चोरीस गेले आहेत. त्यावेळी वाँचमन कोण होता त्याची चौकशी व्हावी आपोआप खरे ते कळलेच. तसेच एम एच ४२ के ०७३८, एम एच ४२ टी १०४४, एम एच ०४ एफ ६७७६, एम एच १२ डिजे ६५५५

यासर्व ट्रक मधुन भंगार वाहुन नेले होते. क्रेन एम एच ४२ ए ९०७८ या वाहनांवर केस दाखल करून चौकशी करणार आहे. कारखाना पाईपलाईन व इलेक्ट्रिक मटेरियल मध्ये त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे तसेच कामगार भरतीचे कारण नसतानाही कामगार भरती विनाकारण केले आहे असे अनेक भ्रष्टाचार अनागोंदी कारभार संजय गुटाळ व त्यांच्या सहकार्याने केला आहे.



