
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अनागोंदी कारभार चालू आहे अशी माहिती शिवसेना उपशहर प्रमुख संतोष गानबोटे यांनी दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की,करमाळा तालुक्यातील 40 ते 50 किलोमीटर वरून रेशन कार्डच्या कामासंदर्भात वयोवृद्ध नागरी इथे येतात ऑनलाइन बंद आहे, आज येथे कोणीच नाही, नंतर या उद्या या परवा या असे अनेक कारणे सांगून त्यांना हेलपाटे

मारायला लावत आहे. गोरगरीब नागरिक रोजंदारीवर जात असताना दिवस बुडवून रेशनकार्ड काम करण्यासाठी करमाळयात येतात आणि पुरवठा विभाग त्यांना सात-सात महिने हेलपाटे मारायला लावत आहे. तरी अशा या पुरवठा विभागातील

अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी माहिती शिवसेना शहर उपप्रमुख संतोष गानबोटे यांनी दिली आहे.



