
करमाळा प्रतिनिधी
करमळा शहरातील मांगी रोडला असणारी एमआयडीसी प्लॉटचे दर कमी करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा शहराध्यक्ष अँड शिवराज जगताप यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गट संस्थापक शरदचंद्रजी पवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, औद्योगिक वसाहतीची जागा गेली 25 ते 30 वर्षांपूर्वी अधिग्रहित एक्वायर करण्यात आलेली

आहे. शासनाने काही दिवसापासून प्लॉट विक्री संदर्भात प्रक्रिया सुरू केली होती परंतु याबाबत उद्योजकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. कारण की ज्या पद्धतीने शासनाने प्लॉटचे दर काढलेले आहेत ते दर अवाजवी चढ्या भावाने असल्याचे दिसून

येते कारण की महाराष्ट्रातील इतर औद्योगिक संस्था यांचे दर पाहिले तर करमाळा औद्योगिक वसाहत व इतर औद्योगिक वसाहतीमध्ये जमीन आसमानचा फरक दिसून येतो. याबाबत अनेक वेळा दर कमी करण्याबाबत मागणी झालेली आहे परंतु

शासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही अनेक उद्योजक सुशिक्षित बेरोजगार यांना उद्योगधंदे वाढवण्यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्या उद्योगाची उभारणी करावयाची आहे परंतु गेले अनेक वर्षापासून प्लॉट विक्रीचे दर पाहिले असता

कोणताही उद्योजक इकडे फिरकत नाही. याबाबत गांभीर्याने विचार करून प्लॉटचे दर कमी करावेत. याबाबत करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी पवार यांना शिष्टमंडळाद्वारे भेट दिल्यानंतर ते म्हणाले की, याबाबत उद्योग मंत्र्याशी

बोलून बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी मकाई कारखान्याचे संस्थापक चेअरमन आप्पासाहेब झांजुर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष व रामवाडीचे सरपंच गौरव झांजुर्णे, करमाळा शहर खजिनदार अरुण टांगडे, शहर उपाध्यक्ष आझाद शेख, संतोष वारगड, सरचिटणीस जावेद शेख, आदि जण उपस्थित होते.
