
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 235 व्या जयंती दिनानिमित्त दिनांक :-१३ सप्टेंबर 2026 रोजी,वार रविवार , सकाळी ठिक:- ९.३० वाजता. जय मल्हार क्रांती संघटना करमाळा तालुक्याच्या वतीने करमाळा शहरात भव्य मिरवणूकीचे आयोजन व विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे… मिरवणूकीचे ठिकाण:- दत्त मंदिर काॅटेज पासून मिरवणूकीस सुरूवात होणार आहे. मिरवणूकीचा मार्ग:- दत्त मंदिर, संगम चौक, गायकवाड चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष चौक, भवानी नाका, देवीचा रोड बायपास ते अथर्व मंगल कार्यालय देवीचामाळ येथे मिरवणूक संपन्न होणार आहे. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ठिक-१२:३० वाजता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत *राजे उमाजी नाईक यांना अभिवादन व दिपप्रज्वलन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी कार्यक्रम स्थळी प्रमुख मान्यवरांचे व्याख्यान आणि काही भाषणे देखील होणार ही आहेत. तरी करमाळा तालुका व पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हिच नम्र विनंती!.
आपले नम्र:- जय मल्हार क्रांती संघटना, राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समिती करमाळा तालुका..
