
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील वेताळ पेठ येथील सेंट्रल स्कूल मध्ये पल्स पोलिओ डोस लसीकरण मोहीम २०२४ राबविण्यात आली असून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुंजकर यांच्या शुभहस्ते लहान बालकांना डोस पाजुन शुभारंभ करण्यात

आला. यावेळी परिवेक्षक नाना चव्हाण, प्रमोद खोबरे उपस्थित होते. यावेळी २०० बालकांना डोस लसीकरण करण्यात आले. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्याकामी आरोग्य सेविका आलीशान पठाण, अंगणवाडी सेविका कदीरा मोमीन यांनी परिश्रम घेतले.





