करमाळा प्रतिनिधी

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वीट जि .प .शाळेत 21 हजाराचे शैक्षणिक साहित्य वाटप .
दि.7/9/2026 रोजी अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने वीट जिल्हा परिषद शाळेत जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेच्या अनुषंगाने, जिल्हा परिषद शाळेतील प्रथम ,द्वितीय ,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचे नियोजन अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते,
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रस्ताविक श्री अर्जुन ढेरे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बागल गटाचे नेते, श्री दिग्विजय भैया बागल, प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा पंचायत समितीच्या सभापती सौ. पुजाताई ढेरे, वीट गणाच्या जी प सदस्या सौ. अश्विनीताई चिवटे तसेच अभय
सिंह राजे भोसले, व मंडळाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व सर्व मित्र मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण अतिशय उत्साहात पार पडले.
प्रस्तावित्तामध्ये बागल गटाचे नेते दिग्विजय भैया बागल यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार विद्यार्थ्यासमोर मांडले व वारणेचा वाघ असा त्यांचा उल्लेख करून सर्व मित्र मंडळाच्या सदस्यांना व कार्यकर्त्यांना अडीअडचणीच्या वेळी मदतीची ग्वाही दिली. प्रमुख पाहुणे सभापती व जि. प सदस्या सौ. अश्विनीताई चिवटे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले पाहिजे व अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ आयोजित केलेला उपक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे. अशा पद्धतीचे उपक्रम सर्व मंडळांनी घ्यावे त्यांचे अनुकरण व आदर्श घेऊन करावे असे आव्हान सभापती व जि .प सदस्या सौ अश्विनीताई चिवटे यांनी उपस्थित त्यांना केले व जाता जाता जि. प सदस्य अश्विनीताई चिवटे यांनी विद्यार्थ्यांच्या स्पोर्ट ड्रेस साठी पाच हजार शंभर रुपये देण्याचे जाहीर केले.
अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांनी गेल्या चार वर्षांमध्ये विविध सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी बांधीलकी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीची जास्तीत जास्त गरज असते. ती गोष्ट म्हणजे शैक्षणिक साहित्य वाटप आणि त्या साहित्यामध्ये त्यांनी विविध स्पर्धा , रांगोळी स्पर्धा ,लिंबू चमचा स्पर्धा ,संगीत खुर्ची स्पर्धा या शाळेमध्ये आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाच्या बक्षीस म्हणून त्यांनी 300 ते 400 रुपये किमतीचे स्कूल बॅग त्यानंतर दोन नंबर ज्या विद्यार्थ्यांच्या आला होता. त्याच्यासाठी दीडशे रुपयाची कंपास पेटी व शालेय पॅड तिसरे बक्षीस म्हणून ठेवले होते .अनेक विद्यार्थ्यांनी हे बक्षीस जिंकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह होता व राहिलेल्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी रजिस्टर क्वायर बुक वह्या कंपास पेट्या पॅड व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्याचे पेनचे शॉपनर चे खोडरबर चे खाऊचे वाटप सर्व मित्र मंडळाच्या व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले, हे सर्व साहित्य जवळजवळ 17 हजार रुपये किमतीचे या मंडळाच्या वतीने वाटप करण्यात आले व अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने या शाळेसाठी स्पोर्ट ड्रेस साठी त्यांनी पाच हजार शंभर रुपये देण्याची घोषणा केली.
या जयंतीसाठी या स्पर्धेसाठी मंडळाचे खालील पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती शिवाजी विद्यालयाचे कर्तव्यदक्ष क्रीडा शिक्षक श्री गोरख ढेरे सर यांनी मांडले व आभार प्रदर्शना नंतर हा कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले
अध्यक्ष, पांडुरंग राजेंद्र चांदणे
उप अध्यक्ष, साईराज महादेव चांदणे
सचिव, महादेव चांदणे, दत्तात्रय चांदणे, किरण चांदणे, योगेश चांदणे, शिवलिंग चांदणे, नितीन चांदणे, सचिन चांदणे, अमोल चांदणे, वैभव चांदणे,सुरज चांदणे, प्रमोद चांदणे, दत्ता चांदणे,महेश चांदणे, गणेश चांदणे, संजय चांदणे, महादेव चांदणे, राहुल चांदणे, बाप्पा चांदणे, भानुदास चांदणे, संतोष चांदणे, साहेबराव चांदणे, मोहन चांदणे,गोरख चांदणे, पृथ्वीराज चांदणे,पवन चांदणे, कमलेश चांदणे
!!खंबीर साथ!!
विठ्ठल चांदणे, सोमनाथ चांदणे, सुभाष चांदणे, हनुमंत चांदणे, तात्याराम चांदणे, अमर चांदणे भीमराव चांदणे, राजेंद्र चांदणे, बाळासाहेब चांदणे, ज्ञानदेव चांदणे, रमेश चांदणे, लक्ष्मण चांदणे, विश्वनाथ चांदणे, अरुण चांदणे, महादेव चांदणे संतोष चांदणे, पांडुरंग चांदणे, विलास चांदणे, पानाचंद चांदणे
!! डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती!!

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *