
चिखलठाण प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रयत्नातून चिखलठाण येथील श्री कोटलिंग देवस्थान साठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी दिली आहे.

१) टोपे बाबा मंदिर मे कोटलिंग देवस्थान पोहोच रस्ता करणे व स्ट्रीट लाईट बसवणे १ कोटी (१०० लाख)
२) श्री कोटलिंग देवस्थान – घाट बांधणे १ कोटी (१०० लाख)

निधी मंजूर केल्याबद्दल चिखलठाण १ व चिखलठाण येथील सर्व ग्रामस्थ व भाविक भक्तांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार मानले आहेत असे अखेर राजेंद्र बारकुंड यांनी सांगितले आहे.



