ॲड. कुणाल येवले यांची सहायक विधी अधिकारी पदी निवड !

प्रतिनिधी : करमाळा येथील रहिवासी आणि सध्या पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत असलेले ॲड. कुणाल उदय येवले यांची आय.बी.पी.एस. मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून बृहन्मुंबई महानगरपालिका (बी.एम.सी.) मध्ये सहायक विधी अधिकारी, वर्ग-2 (असिस्टंट लॉ ऑफिसर, क्लास-2) पदी निवड झाली आहे. या पदासाठी महापालिकेने दि. 5 डिसेंबर 2023 रोजी मुंबई येथे परीक्षा घेतली होती त्याचा अंतिम निकाल आज दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाला आहे. ॲड. कुणाल यांनी वकिली करत-करत अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. ॲड. कुणाल हे स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार कै. शंकरराव येवले यांचे नातू, ज्येष्ठ पत्रकार व मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विवेक येवले यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष उदय येवले यांचे चिरंजीव आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *