
करमाळा प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती जेऊर यांच्यावतीने भव्य मोटरसायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व सर्व महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी वीर माता सोनाबाई काटे व आजी-माजी सैनिक यांच्या हस्ते मूर्तीचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी जेऊर गावचे विद्यमान उपसरपंच नागेश झांजुर्णे, आजी-माजी सैनिक रविंद्र सव्वाशे,

उपाध्यक्ष भास्कर आरकिले, शिवाजी खबाले,सोमनाथ शिरस्कर, कल्याण कदम, आनंद पवार, खंडू लोंढे, ईश्वर पोळ, विश्वंबर लांडगे, तसेच दिलीप जगताप ह.भ.प गुंडगिरी महाराज धोकटे महाराज व जेऊर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अय्युब सय्यद, आरिफ शेख उपस्थित होते. यानंतर महिलांनी जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरूवात केली. नंतर शिवगर्जना पूर्वा मोहिते, आराध्या म्हमाने, लहान मुला

मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती भाषणे तेजस्विनी पाटील, श्रद्धा जगताप, नम्रता सुपे, सिद्धेश वलटे यांनी केली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती व जेऊर निर्मळवस्ती व ठिकठिकाणी जयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी करण्यात

आली. तसेच संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते जेऊर ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब तोरमल यांनी केले.