
सालसे प्रतिनिधी
दिं.१७/०२/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, सालसे. येथे आयोजित केलेल्या बाल आनंद बाजार या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
बाजाराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधला. आपल्याकडील विक्रीस ठेवलेल्या वस्तूंचे महत्त्व सांगितले,

तराजू , वजन, मोजमाप याचा अनुभव मुलांना घेता आला. फळे, अंडी विकण्यासाठी डझन, तर भाजीची जुडी या गोष्टींची विक्री कशी करावी याचाही अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. थेट शेतातून आलेला हिरवा भाजीपाला, फळे, अंडी या सर्व वस्तूंना ग्राहकांनी पसंती दिली.
या आनंद बाजाराचे आकर्षण ठरले. खाद्यपदार्थांची विक्री असणारे स्टॉल या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ बनवून विकणे या

गोष्टीचा अनुभव घेतला. ओली भेळ, सुकी भेळ, वडापाव, भजी, चहा, सरबत व अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.
या बाजारात ग्राहकांनी विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी करताना वस्तूंचा भाव कमी-जास्त करून खरेदी केली. विद्यार्थ्यांनी याकरिता आपल्या मालाचा भाव कसा योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पैशांची देवाणघेवाण, हिशोब यातून मुलांना व्यवहार ज्ञान समजले. आणि शेवटी नफा- तोटा कळला. हा आनंद बाजार मुलांना छोट्या छोट्या व्यवसायांकडे सकारात्मकतेने पाहण्याचा धडा शिकवून गेला.

खरोखर आजचा आनंद बाल बाजार सर्वांना आनंद देणारा ठरला.
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचे मनापासून आभार!!! सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. विजयकुमार गुंड(पालक)
