
करमाळा प्रतिनिधी
श्री छत्रपती संभाजी विद्यालय, निंभोरे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच रविदादा वळेकर यांना निमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी रविदादा वळेकर यांचा सन्मान विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. नंतर सरपंच रविदादा वळेकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि आपल्या अनुभवातून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत याच शाळेतील यशस्वी

विद्यार्थी – विद्यार्थिनींची अनेक उदाहरणे दिली. दहावी विद्यार्थी जीवनातील पहिला व महत्त्वाचा टप्पा आहे हे समजावून सांगत विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांना भेट म्हणून परीक्षेसाठी वापरले जाणारे स्टँडर्ड

कंपनीचे परीक्षा pad दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दहावीचे विद्यार्थी,मुख्याध्यापक,शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच रविदादा वळेकर,मुख्याध्यापक व्यवहारे सर, सर्व शिक्षक – शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
