
केम प्रतिनिधी
केम करमाळा रेल्वे नाल्या खालील कॉक्रीटिकरणचा प्रलंबित प्रश्न प्रहार संघटना व श्री उत्तरेश्वर युवा परिवर्तनच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात करमाळा तालुक्यातील केम गावामध्ये रेल्वे नाल्याखाली जास्त प्रमाणात

पाणी साचत होते. केम गाव अनेक छोटया मोठया खेडयांना जोडल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. नाल्याखालून जाताना छोटी-मोठी वाहने अडकत होती. या सर्व बाबींचा विचार करता परिवर्तन श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपने व प्रहार

संघटना यांनी पाठपुरावा करून सदरचा प्रश्न रेल्वे अधिकारी यांच्याकडून कायमस्वरूपी मार्गी लावला आहे. अखेर काम चालू झाले आहे त्यामुळे गावातील आजूबाजूच्या गावातील लोकांकडून कौतुक होत आहे.


