
करमाळा प्रतिनिधी
स्व. दिगंबर बागल यांच्या स्मृतिदिन दिवशी मकाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी विधानसभा लढवू असे सांगितलं होत. त्यावर कांबळे यांनी त्यास प्रतिउत्तर म्हणून तुम्ही आमदार, खासदार नव्हे तर डायरेक्ट राष्ट्रपती पदी विराजमान व्हा पण आदी गोर गरिबाला मकाई च्या साडेसातीतून मोकळे करा.

ऊस उत्पादकांचा जास्त तळतळाट घेवू नका त्याचे प्रायश्चित नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही आजपर्यंत तारीख पे तारीख, तारीख पे तारीख करत जिल्ह्याच्या वरिष्ट अधिकारी, जिल्हाधिकारी, एस. पी., साखर आयुक्त, उपयुक्त, सह संचालक साखर, तहसीलदार, उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व तालुक्यातील ऊस उत्पादक यांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. त्यामुळे राजकारण विषयी बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाहीच, तुम्ही खुशाल अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बना पण आधी गोरगरिबांचे पैसे द्या. कारण आपली राजकीय कुवत पहाता खूप मोठी आहे हे सर्व तालुक्यातील जनतेला माहित आहे. कारण तुम्ही तालुक्यातील जनतेला उसा सारखे पिळून घेतलेले आहे.

परवा दिग्विजय यांनी आपल्या घरी अकरा गावची मिटिंग घेतली त्यामध्ये शासनाचा बॅन 2008 साली आलेला आहे. त्यावर 2009 ला आमदार कोण होत हे आठवा. शामलताई बागल आमदार असताना हा बॅन उठवू शकला नाहीत तो आपण उठवण्याची भाषा करणे बालिशपणा असून ते उचित नाही व ती आपली कुवतही नाही, हा असलेला बॅन उठवण्याची प्रथम मागणी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गाव भेटी दरम्यान मौजे निलज येथे राजेश गायकवाड यांनी केली होती. त्याच वेळी आमदार शिंदे यांनी लागलीच फोन वरून संवाद साधून त्याचा पाठपुरावा केलेला आहे. तुम्ही उगीच पुतना मावशीचा पान्हा आणू नका व उगाच जनतेची दिशाभूल लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त तुम्ही एकच काम करा मकाईचे बिल देऊन मोकळे व्हा. त्यामुळे बॅन उठवण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही ती कितपत योग्य वाटते जनतेची दिशाभूल करून तुम्ही काय साधणार आहेत, त्यांच्या ऐवजी सर्व तालुक्यातील ऊस उत्पादक बोलवा त्यांच्या पैश्याची व्यवस्था करा मगच बोला, नाहीतर बोल बोल नाऱ्या धोतर गेलं वाऱ्या, आशानी जनता भुलणार नाही रे! जनता बाजारचा भाजीपाला नाही रे!! अशा अभंग वाणीने शेवटी बागल यांची कांबळे यांनी खिल्ली उडवली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, उध्याच्या 29 तारखेला सर्व ऊस उत्पादक शेतकरी बागल यांच्या घरावर मोर्चा काढणार असून करमाळा बंद ची देखील हाक दिलेली आहे या गोष्टी ची तरी लाज दिग्विजय याने बाळगावी व जनतेच्या आक्रोशला समोर येऊन उत्तर देण्यासाठी तयार राहाव.