
कमलाई नगरी
काल दि ११ रोजी येथील श्री दत्त मंदिर दत्त पेठ येथे ब्राह्मण महिला संघ करमाळा यांच्या वतीने हळदी कुंकु व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी ब्राह्मण महिला संघ करमाळ्याची नवीन कार्यकारिणी संगठीत केली .

अध्यक्ष निलिमा अनिल पुंडे, उपाध्यक्ष स्वाती मसलेकर, कोषाध्यक्ष आरती सूर्यपुजारी, सचिव ज्योती कुलकर्णी, सहसचिव शुभांगी खळदकर, संपर्क प्रमुख सारीका पुराणिक, प्रसिद्धी प्रमुख मयुरी गंधे या प्रमाणे बिनविरोध निवडून दिलेल्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचे उपस्थित ब्राह्मण महिला भगिनींनी अभिनंदन केले.

यावेळी ब्राह्मण महिला संघाचे बहुसंख्य महिला उपस्थित होत्या .
कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन कुरुलकर मॅडम च्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक निलिमा पुंडे नी केले. यावेळी पल्लवी तरकसे,

वंदना पाटिल, कुरुलकर मॅडम, ज्योती मांगीकर इत्यादीं नी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार सारीका पुराणिक ने मानले. कार्यक्रम हसतखेळत उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी पुजा मसलेकर, ज्योती कुलकर्णी, शैलजा

भणगे,ज्योती मांगीकर इ. नी विशेष परिश्रम घेतले .
