
जेऊर प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले माझ्या भीमाची सावली दीनदलीतांची आई अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी रमाई असे म्हणतात कि, प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या यशात एका स्त्री चा सिंहाचा वाटा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या

यशाच्या मागे जिजाऊ यांचा सिंहाचा वाटा होता. जोतीबा फुले यांच्या यशस्वी जीवण कार्यामागे सावीत्री बाई फुले यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्ये त्यागमुर्ती रमाई यांचा सिंहाचा वाटा आहे.

माता रमाई कष्टाळू, मेहनती व प्रेमळ होत्या. त्यांनी आपल्या आशा अपेक्षांचा त्याग करुन लाखो दिन दुबळ्यांना स्वाभीमानाची शिकवण देणार्या म्हणजेच रमाई होय. पोटची चार मुल वारली तरी त्यांनी सामाजिक कार्य सोडले नाही व आपल्या रमाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ मध्ये झाला. अशा त्यागमुर्ती रमाई मातेला जयंती निमीत्त विनम्र अभिवादन

करण्यात आले. यावेळी उपस्थित नितीन खटके, निलेश पाटील, धन्यकुमार गारुडी, बालाजी गावडे, अतुल निर्मळ, बाळासाहेब तोरमल, आदिनाथ माने, किशोर कदम, हेमंत शिंदे, पिंटू जाधव, अजित उपाध्ये, सागर लोंढे, पांडुरंग घाडगे, जयकांत गावडे,

विजयकांत गावडे इत्यादी उपस्थित होते.
