
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील लक्ष्मण केकान यांची गाव चलो अभियानाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीणच्या जिल्हा संयोजक पदी नियुक्ती झाली असून येणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अभियानासाठी निवडणुकीच्या काळात त्यांनाही जबाबदारी

मिळाली आहे. कार्यकर्त्यापासून प्रदेशाध्यक्षांपर्यंत प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता २४ तास एका गावात मुक्कामी जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती घराघरात पोहोचवण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. अशा महत्त्वपूर्ण अभियानाचे संयोजक लक्ष्मण

केकान यांना करण्यात आले असून त्यांच्या आजपर्यंत केलेल्या कार्यामुळे त्यांनाही जबाबदारी मिळाली आहे. जबाबदारी नंतर बोलताना लक्ष्मण केकान म्हणाले की, या अभियानात पूर्ण जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मानस आहे व पूर्ण क्षमतेने आम्ही तो करू. येणाऱ्या

निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीला भरघोस मताधिक्याने विजय प्राप्त करण्यासाठी या अभियानाचा फायदा होणार आहे. या निवडीचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, लोकसभेचे निवडणूक प्रमुख माजी

आमदार प्रशांत परिचारक, लोकसभा संयोजक राजकुमार नाना पाटील, जिल्हाध्यक्ष चेतन श्रीकांत केदार यांनी त्यांचे

अभिनंदन केले.