करमाळा प्रतिनिधी  

21 जानेवारी रोजी पुणे येथे झालेल्या ऑरिस्टो किड्स आयोजित अबॅकस अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये करमाळा येथील नावाजलेली मुथा अबॅकस अकॅडमी मधून शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या परीक्षेसाठी चार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग विविध देशांमधून विविध राज्यांमधून विविध जिल्ह्यांमधून होता. श्रीलंका व अमेरिका ईथे विद्यार्थी घेऊन पोहोचलेले होते.

त्यामधून नगर परिषदेच्या कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१ या शाळेच्या सर्व सहभागी विद्यार्थिनींनी यशाचा उच्चांक मिळवलेला आहे व आपल्या शाळेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले आहे. या शाळेची विद्यार्थिनी समीक्षा महेश थोरे हिने आज पर्यंत चार आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षा दिलेल्या आहे व तिने प्रत्येक परीक्षेमध्ये फर्स्ट रँक मिळवलेला आहे.

तसेच या शाळेची विद्यार्थिनी शरयू रघुनाथ फरतडे इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी हिने सलग तिसऱ्या वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरून यशस्वी होण्याचे मानांकन मिळवले आहे. समीक्षा थोरे हिने अबॅकस तिसऱ्या लेवल मध्ये सहभाग नोंदवलेला होता. तिने फक्त 5.30 मिनिटांमध्ये 75 गणिते करेक्ट सोडवलेली आहेत. शरयू ही दुसऱ्या लेव्हलमध्ये सहभागी होती. तिने फक्त

पाच मिनिट यामध्ये 75 गणिते करेक्ट सोडवलेली आहेत. मनस्वी वैभव पोतदार, श्रावणी महेश गवळी, अनुजा लक्ष्मण भोसले, आर्वी विश्वचंद्र बडेकर या विद्यार्थिनींनीही सर्व गणिते अचूक सोडवल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय चौथा रँक मिळवलेला आहे.

या सर्व विद्यार्थिनींना मुथा अबॅकस अकॅडमीच्या संस्थापिका ज्योती मुथा, मुख्याध्यापक दयानंद चौधरी, वर्गशिक्षिका तृप्ती बेडकुते, निलेश धर्माधिकारी, संध्या शिंदे, रमेश नामदे, भाग्यश्री पिसे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनीच्या या

यशाबद्दल मुख्याधिकारी बालाजी लोंढे, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, शाळेचे मुख्याध्यापक दयानंद चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमृत सिंग परदेशी, सर्व सदस्य, सर्व शिक्षक, वृंद, पालक यांनी या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *