करमाळा प्रतिनिधी  

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील पारेवाडी रेल्वे स्टेशन येथील ग्रामस्थ प्रवासी गेली अनेक वर्षापासुन पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीला थांबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याकामी मध्यंतरी एल्गार मोर्चाही काढण्यात आला.

विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखिल रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून एक तरी एक्सप्रेस गाडी थांबविणारच असे अभिवचन दिले होते. केम, जेऊर स्टेशन नंतर पारेवाडी ला गाडी थांबविणे महत्वाचे होते परंतु विद्यमान

खासदार यांनी अक्षाप पर्यंत ही मागणी पुर्ण केलेली नाही. एवढेच नाही तर या ठिकाणी असणाऱ्या रेल्वे बोगदयाचे ठिकाणी रस्त्याचे काम झालेले नाही. याबाबत देखिल अनेकवेळा निवेदने दिली आहेत. परंतु काम झाले नाही. येथिल ग्रामस्थांनी

फेसबुक, मेल, ट्वीटर च्या माध्यमातून देखिल प्रशासनाला व रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा केला आहे, परंतु अनेकदा सांगुनही रेलवे प्रशासन ढिम्म पद्धतीने चालु आहे. रेल्वे गेट नंबर २८ ची अवस्था तर बिकट झाली आहे. त्यामुळे गेट नं.-२८

गेटचे ठिकाणी नवीन बोगदयातील रस्ता व रेल्वे थांबा बाबत चे काम लवकर न झालेस लवकरच उग्र आंदोलन करण्याचे विचारत असल्याचे ॲड. अजित विघ्ने यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *