करमाळा प्रतिनिधी

केम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी माजी आमदार जयवंतराव जगताप गटाच्या सारिका भिमराव शिंदे यांची व व्हा. चेअरमन पदी चंद्रकांत अभिमान दोंड यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणुक निर्णय

अधिकारी तथा प्र. सहाय्यक निबंधक उमेश बेंढारी होते. केम वि.का.से. सोसायटीची निवडणूक नुकतीच अविरोध झाली होती. या निवडीप्रसंगी नुतन संचालक दिलीप दोंड, विलास बिचितकर, आनंद शिंदे, दयानंद तळेकर, दत्तात्रय बिचीतकर, महादेव

पारखे, अच्युत तळेकर, किरण तळेकर, कौशल्या दोंड, नवनाथ कोळेकर, बाळासाहेब देवकर, सुमीत ओहोळ, मार्केट कमिटीचे संचालक सागर दोंड, संजय दोंड, भिमराव शिदे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर माजी आमदार

जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांचे सत्कार करून शुभेच्छा दिल्या. प्रास्तविक सोसायटीचे सचिव बबनराव मेहेर यांनी व आभार गटसचिव लक्ष्मण थोरात यांनी व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *