
“हाकेला ओ देणारा आमदार संजयमामा शिंदे”
जेआरडी माझा
वार शुक्रवार दि. ५/१/२०२४ रोजी करमाळा तालुक्यांतील अंगणवाडी सेविका/ मदतनीस यांनी करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे साहेब यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे मानधनात वाढ करावी सह अन्य मागण्या केल्या होत्या.
यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांनी लवकरच राज्याच्या महिला व बलकल्याण मंत्री कु.आदितीताई तटकरे यांना आपल्या सर्व मागण्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती.

याचाच एक भाग म्हणुन आज सांगोला येथे राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा.दिपक(आबा)साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बलकल्याण मंत्री कु.आदितीताई तटकरे आल्या होत्या या कार्यक्रमाला आमदार मा.संजयमामा शिंदे यांनी अंगणवाडी सेविका/मदतनीस यांच्या मागणीचे पत्र राष्ट्रवादी कोंग्रेसचे युवा नेते आशपाक जमादार यांनी नामदार कु.आदितीताई तटकरे यांना दिले व आमदार संजयमामा शिंदे व नामदार कु.आदितीताई तटकरे यांचे या मागण्या पुर्ण करण्यासंदर्भात फोन वरुन चर्चा झाली.

यावेळी सांगोला विधानसभेचे आमदार मा.शहाजी(बापु)पाटील,पारनेर विधानसभेचे आमदार निलेश लंके साहेब,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी राज्य प्रवक्ते मा.उमेश(दादा)पाटील,सोलापुर जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड,स्व.वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.कल्याणराव काळे आदि उपस्थित होते.