
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील शाहूदादा फरतडे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

पक्षाचे मुखपत्र असलेल्या दै. सामना मधून हि निवड जाहीर झाली असून फरतडे यांच्या निवडीचे शिवसैनिकातुन जोरदार स्वागत होत आहे.

नागोबाचे हिवरे हे फरतडे यांचे मुळ गाव असून शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उप तालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख या पदावर त्यांनी काम केले असुन आजवरचे संघटना वाढीसाठीचे योगदान लक्षात घेऊन पक्षाने त्याना उपजिल्हाप्रमुख पदावर काम करण्याची संधी दिली आहे.

पक्षबांधणी साठी झोकून देवून काम करणार असल्याचे फरतडे यांनी सांगीतले.


