करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तर वडगाव याठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीची पुर्नगठन बैठक दि.30/12/2023 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

यावेळी सर्व पालक, गावातील जेष्ठ व्यक्ती,प्रतिष्ठित नागरिक,महिला पालक आणि सर्व शिक्षक उपस्थित  होते.

ही बैठक शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव नवनाथ ससाणे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जातेगाव केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख मा. रमाकांत गटकळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

 सुरुवातीला शासन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समितीची रचना,कार्य तसेच जबाबदारी याविषयी सविस्तर माहिती शाळेतील शिक्षक सुनिल नरसाळे सर यांनी सांगितली.

  सदर बैठकीमध्ये रोहिणी संजय रोडगे यांची अध्यक्ष म्हणून तर मोहसीम शेख यांची उपाध्यक्ष म्हणून तसेच कोमल लखन अंधारे, अंजली संदिप थोरात, सागर हनुमंत वाडेकर, किरण निवॄत्ती रोडगे, राणी बालाजी अंधारे, अश्विनी धनंजय भांडवलकर यांची सदस्य म्हणून

तर शिक्षण तज्ज्ञ म्हणून प्रशांत भांडवलकर यांची निवड करण्यात आली.

 अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर शिंदे सर यांनी केले. मुख्याध्यपक नवनाथ ससाणे सर यांनी सर्वांचे आभार मानले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश होनकळसे सर व सुलभा खुळे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

     बैठकी दरम्यान सर्व ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात  कार्यक्रम पार पडला.

सदर सभेस सर्व वर्गातील पालक,मकाईचे चेअरमन दिनेश (दादा)भांडवलकर, दूध डेअरीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत काळे,  बशीर शेख, बिभिषण भांडवलकर, बाबूलाल अंधारे,शैलेश शेगडे कालिदास जोशी जावेद पठाण शहाजी भांडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *