करमाळा प्रतिनिधी
बातमीदार दि. १ वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे महाराष्ट्र आयोजित वास्तु विशारद या अभ्यासक्रमा मध्ये प्रवेश घेऊन महेश सुमंत कुलकर्णी मांजरगाव यांनी तो यशस्वी रीत्या पुर्ण केला असुन संस्थेकडून घेण्यात आलेल्या परीक्षे मध्ये ५०० पैकी ४८५ गुण प्राप्त करून बॅच क्रमांक ९ मध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे तसेच अंकविशारद हा अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. त्यांना संस्थेकडुन वास्तुविशारद पदवी व अंकविशारद प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.
दि. २८ रोजी संस्थेमार्फत हा समारंभ विणकर सभागृह सातारा रोड पुणे याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे
प्रमुख अतिथी ह्या सुप्रसिद्ध
अध्यात्मिक एवं ज्योतिष लेखिका गूरूश्री प्रियाताई मालवणकर
तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्योतिष शलाका जयश्रीताई बेलसरे
तसेच फल ज्योतिष संस्थेचे विजय जकातदार व प्रसिद्ध लेखक बबन पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते वास्तुविशारद व अंकविशारद च्या सर्व विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्रे देण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष, वेदमूर्ती, वास्तुभुषण, डॉ. उमेश रमेश कुलकर्णी
यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले “लोकानाम हितकाम्यया” या तत्वावर आधारित संस्थेकडुन प्रत्येक घरात
वास्तुशास्त्र पोहचवण्याच्या हेतुने हे अभ्यासक्रम आयोजित केले जात असुन प्राचीन वास्तुशास्त्र घराघरा पर्यंत पोहचवावे हाच मुख्य उद्देश आहे असे मत व्यक्त केले. याबरोबरच अंकविशारद, सुखी संसार कसा करावा , या सारखे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केलेले आहेत. याचा लाभ घेऊन जीवन समृद्ध करावे तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी या वर्गांचा लाभ घ्यावा असे अवाहन केले.
यावेळी मान्यवरांचे मौलिक मार्गदर्शन सर्व विद्यार्थांना मिळाले
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.