करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2022 चा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला असून करमाळा शिवसेना उपशहरप्रमुख राजाभाऊ काळे यांचा पुतण्या हल्ली सूर्डी (ता. बार्शी) अक्षय

ईश्वर काळे या तरुणाने यशाला गवसणी घातले आहे. त्याची राज्यकर निरीक्षकपदी निवड झाली आहे. व सहाय्यक कक्ष प्रमुख मंत्रालय यात तो राज्यात पहिला आला आहे. यामुळे सुर्डी येथे व करमाळयात जल्लोष साजरा होत आहे. मित्र परिवाराकडून

त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अक्षय काळे यांचे वडील ईश्वर काळे हे महावितरण मध्ये प्रिन्सिपल ऑपरेटर पदावर माढा येथे कार्यरत आहेत. अक्षय यांचे शिक्षण पहिली ते दहावी महात्मा गांधी विद्यालय करमाळा व दिलीपराव सोपान

विद्यालय बार्शी, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स सोलापूर येथे झाले आहे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. परीक्षेचा अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांचे आजोबा कै. मच्छिंद्र काळे यांच्याकडून घेतली. त्यांचे आजोबा

ग्रामसेवक ते विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. अक्षय यांचे लहान बंधू अजय काळे आय आयटी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल करमाळा शिवसेना उपशहरप्रमुख राजाभाऊ काळे यांनी करमाळा येथे त्यांचे समर्थक व कार्यकर्ते यांच्यासह परिवारातर्फे पेढे वाटून आनंद साजरा केला होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *