करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या योजना सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र कष्ट घेत आहेत.
सर्वसामान्य अडचणीतल्या लोकांना केलेली मदत हीच खरी आयुष्याची पुंजी आहे, संपत्ती आहे त्यातच समाधान आहे असे मत बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या वतीने 227 बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वांगडे, प्राध्यापक अशोकराव नरसाळे, पत्रकार नासिर कबीर, विशाल परदेशी, नागेश शेंडगे, जयंत दळवी, विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे, तालुका प्रमुख देवानंद बागल, जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, उप तालुकाप्रमुख दादासाहेब थोरात, शहर प्रमुख नागेश गुरव, वाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, शाखाप्रमुख निलेश चव्हाण आदि पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना पुढे हिरडे म्हणाले की, समाजात काम करत असताना अडचणीतल्या माणसाला मदत करण्याची ज्याच्या मनात भावना असते व त्यासाठी आपला वेळ खर्च करण्याची तयारी असते अशा लोकांच्या माध्यमातूनच समाजसेवा होऊ शकते. शासनाच्या योजना भरपूर असतात पण त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निर्माण झालेली दलालांची साखळी ही
लाभार्थ्यांना अडचणीत आणते. यामुळे दलालाची साखळी मोडून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांची काम करण्यासाठी प्रयत्न घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्य पर्यंत मदत पोहोचवण्याचे काम करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे करत असून एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांचा नाम उल्लेख सर्वत्र केला जातो. याचा सुद्धा पूर्ण करमाळा तालुका वासियांना अभियान आहे.
बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, करमाळा शिवसैनिक तालुक्यात दोन हजार बांधकाम नोंदणी कामगार करून त्यांना प्रत्यक्षात लाभ दिला आहे. शिवाय त्यांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घरकुल मिळून घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत.
…………….
सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नेमणूक झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा सत्कार करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने बाबुराव हिरडे, नासिर कबीर, प्राध्यापक अशोक नरसाळे, जयंत दळवी, नागेश शेंडगे, विशाल परदेशी यांनी केला.