करमाळा प्रतिनिधी

“असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभारणे हेच आमुचे शील असे” असे हे संतवचन ज्यांना तंतोतंत लागू पडते. असे आपणा सर्वांना पितृस्थानी असणार पाठक सरांच्या रूपातील कडक शिस्तीचे पण सदा सर्वदा हसतमुख असणार परिपूर्ण व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड झाले.

प्रांत कार्यकारिणी मधील आपल्या सवंगड्यांसोबत नेहमी प्रमाणेच हसतमुख असायचे पण नियतीच्या मनातील चाहूल कुणालाच कळून आली नाही. आज सकाळी सरांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दाखल केले असता सरांची प्राणज्योत मालवली. सरांचे आपल्यातून अकस्मितपणे निघून जाणे सर्वांनाच धक्कादायक आहे.

एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा जिद्दीचे, आपल्या स्वभावाला मिश्किलतेची किनार लाभलेले, आपल्या तत्त्वांना, अनुभवसंपन्न विचारांना दूरदृष्टीची जोड असणारे, सर्वांप्रती आस्था आणि आत्मीयता जोपासणारे, अध्यात्मिक वारसा लाभलेले, संघटन प्रती आस्था,  आत्मियता, कडक शिस्त, आपल्या सहवासातून समोरच्याच्या अंगात एक नवचैतन्य आणणारे, ज्यांच्या कडून अनुभवांची शिदोरी मिळायची, भाळी शितलतेची चंद्रकोर ललाकणारे असं सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे मध्य महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष भालचंद्रजी पाठक सर.

आज राष्ट्रीय ग्राहक दिनी सर्वत्र प्रबोधन कार्यक्रम सुरु असताना, स्वतः पाठक सरांच्या मार्गदर्शनाखाली गेली 15 दिवस प्रांत कार्यकारिणी बैठकीचे नियोजन सुरु असतानाच अखेरच्या श्वासापर्यंत ग्राहक चळवळीच्या कार्यात मग्न असणाऱ्या पाठक सरांचे पडद्याआड जाण्याने ग्राहक चळवळीचा एक अनुभवी, समृद्ध विचार संपन्न मार्गदर्शकाला ग्राहक चळवळ पोरकी झाली. सरांच्या अनुभव संपन्न आणि चिंतनीय विचारांची यापुढील काळात जोपासना करून ग्राहक चळवळ त्या आदर्श विचारातून चालवणे हिच आपणा सर्व व्रतधारी कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.

ओम शांती ओम

शोकाकूल – ग्राहक चळ्वळीतील सर्व व्रतधारी कार्यकर्ते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *