चिखलठाण ग्रामपंचायतच्या वतीने परिसरातील रुग्णांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

चिखलठाण करमाळा तालुक्यातील चिखलठाण ग्रामपंचायत व मगर हॉस्पिटल इंदापूर यांच्या वतीने आयोजित नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिरात २१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली व उपस्थित रुग्णांना डोळ्यांच्या आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

      चिखलठाण ग्रामपंचायतच्या वतीने परिसरातील रुग्णांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सरपंच धनश्री गलांडे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड मकाईचे संचालक दिनकर सरडे चिकलठाण सोसायटीचे अध्यक्ष विकास गलांडे उपसरपंच आबा मारकड ग्रामपंचायत सदस्य हेमंत बारकुंड मच्छिंद्र सरडे, आदिनाथ सरडे,  प्रमोद गव्हाणे, यांचे उपस्थित होते यावेळी बोलताना नेत्रतज्ञ डॉ. गीता मगर म्हणाल्या की डोळ्यांचे अनेक विकार हे केवळ लोकांच्या दुर्लक्षितपणामुळे व योग्य ती काळजी न घेतल्यामुळे उद्भवतात हे टाळण्यासाठी डोळ्याच्या आरोग्य विषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे त्यामुळे भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड  संचालक दिनकर सरडे यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाल गव्हाणे यांनी केले तर आभार सतीश बनसोडे यांनी मानले या शिबिरामध्ये 215 रुग्णांची तपासणी करून गरज असणाऱ्या काही रुग्णांवर अल्प दरात पुढील उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य आनंद पोळ,पुष्पा चव्हाण, संभाजी कांबळे, संतोष सरडे,धनाजी मारकड, फिरोज तांबोळी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *