
करमाळा प्रतिनिधी
करमाळा एसटी आगारासाठी तातडीने ३० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगीतले कि, करमाळा एसटी आगाराकडे बसेसची संख्या कमी असून त्यादेखील नादुरूस्तीचे प्रमाण जास्त आहे. सुस्थितीतील एसटी

बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. करमाळा आगाराला लांब व जवळच्या पल्ल्यासाठी एकूण ८५ बसेसची आवश्यकता असताना ६५ बसेस उपलब्ध आहेत. त्यातील १० नादुरुस्त आहेत ,त्यामुळे गाड्या फेल होणे – रद्द होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पासेस काढलेले शालेय विद्यार्थी, रुग्ण व प्रवाशांना प्रचंड गैरसोईला सामोरे


जावे लागत आहे. शासनाने महिलांना व ज्येष्ठांना सवलतीच्या दरात प्रवास सुविधा दिल्यामुळे एसटी कडे प्रवाशांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु बसेसची संख्या व त्यातही सुस्थितीतील बसेसची संख्या अपुरी आहे.
